उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर रवाना 

नवी दिल्ली – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू तीन आफ्रिकी देशांच्या दौऱ्यावर आज रवाना झाले. 6 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात उपराष्ट्रपती बोट्‌स्वाना, झिंबाब्वे आणि मलावी या देशांचा दौरा करणार आहेत. या तीन देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा, व्यापारी समुदाय आणि भारतीय समुदायालाही उपराष्ट्रपती संबोधित करणार आहेत.

उपराष्ट्रपतींसमवेत उच्चस्तरीय, संसदीय प्रतिनिधी मंडळही रवाना झाले आहे. बोट्‌स्वानाच्या राजधानीत तेराव्या वार्षिक जागतिक प्रदर्शनाचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती आज करणार आहेत. भारताची आर्थिक आणि औद्योगिक प्रगती दर्शवत 25 भारतीय कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत. बोट्‌स्वानाच्या उपराष्ट्रपतींची नायडू उद्या भेट घेणार आहेत. 3 नोव्हेंबरला उपराष्ट्रपती झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन मनंगाग्वा यांच्याशी चर्चा करतील. 5 नोव्हेंबरला मलावीचे राष्ट्राध्यक्ष पीटर मुथारिका यांच्याशी उपराष्ट्रपती चर्चा करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)