विश्‍व हिंदु परिषदेतर्फे आता प्रत्येक लोकसभा मतदार संघात मंदिरासाठी मेळावे 

नागपुर: अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या चळवळीला लोकांचे समर्थन मिळवण्यासाठी देशातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात विश्‍व हिंदु परिषदेच्यावतीने 6 डिसेंबर पर्यंत हिंदु जागृती मेळावे घेतले जातील अशी माहिती या संघटनेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोककुमार यांनी येथे दिली. राम मंदिरासाठी जो कायदा प्रस्तावित केला जाईल त्या कायद्याला समर्थन देण्याचा आदेश आम्ही या मेळाव्यांद्वारे तेथील खासदाराला देणार आहोत असे ते म्हणाले. ते म्हणाले की राम मंदिर प्रकरणात 1950 साली देशातील पहिली केस कोर्टात उभी राहीली होती पण अजून तो विषय न्याय प्रलंबीतच आहे असे ते म्हणाले.

ते म्हणाले की दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार त्वरीत अटक करण्याची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने दलितांच्या हितासाठी तातडीने कायदा करून ही तरतूद कायम ठेवली तशीच कायदेशीर तरतूद राम मंदिराच्या बाबतीत या सरकारला करता येईल. सरकारने हा प्रयत्न करून पहावा. त्या प्रस्तावाला देशातील प्रत्येक खासदाराने पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही प्रत्येक खासदाराच्या मतदार संघात जाऊन त्यांच्यावर दबाव आणू असेही त्यांनी नमूद केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)