ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन 

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी आली आहे. ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे आज ८१ व्या वर्षी निधन झाले. कॅनडामधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कादर खान यांचा मुलगा सरफराज खानने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्‍लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे कादर खान यांच्या मेंदूचे काम करणे बंद झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. त्यानंतर सातत्याने त्यांची प्रकृती खालावतच गेली.

दरम्यान, कादर खान यांनी ‘दाग’ या चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ४३ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तसेच २५० हून अधिक चित्रपटांचे संवाद त्यांनी लिहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)