ज्येष्ठ अभिनेते कादरखान यांचे निधन

वयाच्या 81 व्या वर्षी कॅनडात घेतला अखेरचा श्‍वास

टोरांटो: हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि संवाद लेखक कादरखान यांचे काल रात्री दीर्घ आजाराने कॅनडात निधन झाले ते 81 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने त्यांना कॅनडातील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथेच त्यांचे काल संध्याकाळी स्थानिक वेळेनुसार सहा वाजता निधन झाले. गेले 16 ते 17 आठवडे त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. खान यांचे सारे कुटुंबीय कॅनडातच असून त्यांच्यावर तेथेच अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव सर्फराज यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काबुल मध्ये जन्म झालेले कादर खान यांनी 1973 साली चित्रपट क्षेत्रातील कारकिर्द सुरू केली. राजेश खन्नांचा दाग हा त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील पहिला चित्रपट होता. त्यांनी सुमारे तीनशे चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी अडीचशे सिनेमांसाठी संवाद लेखनही केले आहे. मनमोहन देसाई आणि प्रकाश मेहरा या सिनेदिग्दर्शकांच्या चित्रपटांचे संवाद लेखन त्यांच्याकडेच असायचे. धरमवीर, गंगा जमना सरस्वती, कुली, देशप्रेमी, सुहाग, परवरीश, अमर अकबर ऍन्थनी, ज्वालामुखी, शराबी, मुक्कदर का सिंकदर हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. यातील बहुतांशी चित्रपटांची पटकथा आणि संवाद लेखन त्यांनी केले आहे.

सुरूवातीला खलनायकी स्वरूपाच्या भूमिका करणाऱ्या कादरखान यांनी हिंमतवाला या सिनेमात पहिल्यांदा विनोदी ढंगाची भूमिका केली. त्यानंतर त्यांना अशाच छापाच्या अनेक भुमिका मिळाल्या त्या त्यांनी समर्थपणे साकारल्या. अभिनेता गोविंदा यांच्याशी त्यांची विशेष केमिस्ट्री जमली होती. या जोडगोळीने अनेक चित्रपटांमध्ये धमाल उडवली आहे. त्यांच्या निधनाबद्दल सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक नामवंत अभिनेत्यांनी दुख: व्यक्त करीत त्यांना आदरांजली वाहिली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)