प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनेता दिलीपकुमार पुन्हा रूग्णालयात 

मुंबई: प्रकृती अस्वास्थ्यामुळे 95 वर्षीय ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना काल पुन्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना न्युमोनिया झाला असून त्यांच्यावर त्यासंबंधात उपचार सुरू आहेत अशी माहिती त्यांच्या कुटुंबाचे निकटवर्तीय फैसल फारूकी यांनी कळवले आहे. गेल्या महिन्यातही त्यांना न्युमोनियामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पण थोड्याच दिवसांत त्यांची प्रकृती ठीक झाल्यानंतर त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीविषयीची माहिती आम्ही नियमीतपणे ट्‌विटरवरून कळवत जाऊ पण सध्या तरी काळजी करण्यासारखे काही दिसत नाही असे फैसल यांनी म्हटले आहे. बॉलिवुडचा ट्रॅजेडी किंग अशी प्रतिमा असलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कसदार अभिनयाने एक मानदंड प्रस्थापित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)