व्हेरॉक क्‍लब अंतिम फेरीत दाखल

स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा 2018

पुणे – अद्वैत मुळे, यद्नेश मोरे आणि राहुल वारे यांनी केलेल्या तडाखेबाज फलंदाजीच्या बळावर व्हेरॉक संघाने क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या संघाचा 3 गडी राखून पराभव करताना येथे सुरू असलेल्या स्टार ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून अंतिम फेरीत त्यांचा सामना आयर्न्स क्‍लबशी होणार आहे.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या सम्घाने निर्धारित 45 षटकांत 6 बाद 217 धावांची मजल मारताना व्हेरॉक संघासमोर विजयासाठी 218 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना व्हेरॉकसंघाने हे आव्हान 4302 षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात पुर्न करताना स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

यावेळी प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या व्हेरॉक संघाचे सलामीवीर अद्वैत मुळे आणि यद्नेश मोरेयांनी संघाला सावध सुरुवात करुन दिली. यावेळी दोघांनीही सावध परंतू आवश्‍यक धावगतीला अनुसरून खेळ करताना संग्य्हाचे अर्धशतक फलकावर लगावले. यावेळी यद्नेशने 51 चेंडूत 33 धावाम्ची खेळी केली. तर, अद्वैतने 56 चेंडूत 53 धावांची खेळी केली. हे दोघेही बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या किरन मोरेनेही चांगली फलंदाजी करताना 21 धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला.

यानंतर फलंदाजीस आलेल्या यश जगदाळेला जास्त चमक धाकवता आली नाही. त्याने केवळ 15 धावांची खेळी केली. तर, त्यानंतर अमन मुल्ला आणि मनंग बारीयांनी सम्घाचा डाव सावरत संघाला विजयाच्या दिशेने नेले. यावेळी अमनने 27 तर मनंगने 30 धावांची खेळी केली. यानंतर राहुल वारे आणि साईगनेश वारीने संघाचुया विजयावर शिक्‍कामोर्तब केला. यावेळी राहुलने नाबाद 23 तर साईगनेशने नाबाद 9 धावांची खेळी केली. यावेळी क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या निखिल कारभारीने 34 धावांत 2 गडी बाद केले. तर, विराज दारवटकरने 37 धावांत दोन गडी बाद करत त्याला साथ दिली.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करनाऱ्या क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या सलामीवीरांनी चांगली सुरूवात करुन दिली. त्यांचे सलामीवीर राजवर्धन उंद्रे आणि सुरज परदेशीयांनी सावध फलंदाजी करताना संघाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू केली.

यावेळी सुरज परदेशीने 21 धावांची खेळी केली. सुरजबाद झाल्यानंतर क्‍लब ऑफ महाराष्ट्रच्या मधल्याफळीतील फलंदाज विशेष कामगिरी नोंदवू शकले नाही. मात्र, अखेरच्या फळीतीला सज्योत सुतारने 50 चेंडूत 62 धावांची खेळी करत संघाला 217 धावांपर्यंत मजल मारून दिली. यावेळी त्यांचा सलामीवीर राजवर्धन उंद्रेने 123 चेंडूत 81 धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक –

क्‍लब ऑफ महाराष्ट्र 45 षटकांत 6 बाद 217 (राजवर्धन उंद्रे 81, संज्योत सुतार 62, सुरज परदेशी 21, मनंग बारी 33-2, राहुल वारे 40-2) पराभुत विरुद्ध व्हेरॉक 43.2 षटकांत 7 बाद 221 (अद्वैत मुळे 53, यद्नेश मोरे 33, मनंग बारी 30, राहुल वारे नाबाद 23, निखील कारभारी 34-2).


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)