प्रचार साहित्याची पडताळणी अनिवार्य

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांची सूचना
सातारा –
लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी प्रचाराराचे साहित्य जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पडताळणी करुन घेणे आवश्‍यक आहे. जे उमेदवार पडताळणी न करता प्रचार साहित्य प्रचारासाठी वापरत असेल अशा उमेदवारांवर तात्काळ कारवाई करा, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केल्या.

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला उपजिल्हाधिकारी पुनम मेहता, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.

सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तात्काळ जिल्ह्यातील खासगी मुद्राणालयधारकांची बैठक घेऊन उमेदवारांच्या प्रचार साहित्य प्रकाशनाबाबत आदर्श आचारसंहिता समजुन सांगावी. उमेदवारांनी प्रचारासाठी वापरण्यात येणारी प्रत्येक जाहिरात ही जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचीकडून तपासून घेणे बंधनकारक आहे. प्रचार साहित्य निर्मितीसाठी आलेला खर्च, प्रचाराचा खर्च हा खर्च पडताळणी समितीकडे देणे बंधानकारक आहे. प्रत्येक उमेदवाराचे व पक्षाचे स्वतंत्र खर्चाबाबतचे रजिस्टर ठेवावे. उमेदवाराच्या प्रत्येक रॅलीवर, सभेवर बारकाईने लक्ष ठेवावे त्याचा खर्च वेळोवेळी सादर करावा. उमेदवारांनी केलेला खर्च व सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खर्च तपासा खर्चात तफावर असल्यास तात्काळ नोटीस बजवाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी शेवटी केल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)