कायदेशीर बाबी तपासून शिक्षक पात्रता परीक्षेबाबतचा (टीईटी) निर्णय – विनोद तावडे

मुंबई: राज्यातील सर्व प्राथमिक शाळांतील शिक्षक पदावरील नियुक्तीकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करुन शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली आहे. याबाबतचा पुढील निर्णय कायदेशीर बाबी तपासून घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य सर्वश्री दत्तात्रय सावंत, विक्रम काळे, नागो गाणार, हरिभाऊ राठोड यांनी मांडली होती. त्यावेळी विनोद तावडे बोलत होते.

-Ads-

यावेळी विनोद तावडे म्हणाले, राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असलेले उमेदवार उपलब्ध असताना त्यांची नियुक्ती न करता सेवेत असलेल्या शिक्षकांना सदर पात्रता परीक्षा पात्र होण्यास मुदतवाढ दिल्याच्या कारणास्तव उच्च न्यायालय,खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
1 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)