व्हेनेन्झुलेलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो हल्ल्यानंतर आज सार्वजनिक ठिकाणी 

काराकस (व्हेनेन्झुएला): मागील शनिवारी व्हेनेन्झुलेलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी ड्रोन हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर मादुरो हे आज पुन्हा सार्वजनिक ठिकाणी असणार आहेत.

मिलिटरी परेड दरम्यान निकोलस मादुरो यांचे भाषण सुरु होते आणि त्याचे व्हेनेन्झुलेलाच्या अनेक वाहिन्यानावर थेट प्रक्षेपण देखील चालू होते. अचानक तेथे प्रसारण काही तांत्रिक खरबीमुळे वा अन्य गोष्टींमुळे बंद करण्यात आले होते. त्यानंतर  मादुरो यांनी पाणी त्यांच्या सरकारने त्यांच्यावर दोन ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. ज्यात स्फोटके होती.
याबाबत मादुरो यांनी कोलंबियन राष्ट्रपती जुआन मॅन्युअल सॅंतोस यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर फ्लोरिडा मधील काही गटांनी देखील त्यांना मदत केल्याचे मादुरो यांनी म्हटले होते. या घटनेनंतर व्हेनेन्झुलेला, कोलंबिया आणि अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यांच्या सीमेवर खूप तणाव निर्माण झाला होता.
व्हेनेन्झुलेलाचे ५५ वर्षीय राष्ट्रपती निकोलस मादुरो हे आज पुन्हा सार्वजनिक ठिकाणी येथील आणि आपल्या जनतेला संबोधित करताना अनेक गोष्टींचा खुलासा करतील.
मादुरोआणि त्यांच्या मित्रदेशांनी हा त्यांच्या हत्येसाठी केलेला ड्रोन हल्ला असल्याचे बोलले आहे. तर क्यूबा, बोलिव्हिया, सीरिया, इराण आणि रशिया यांनी झालेल्या गंभीर प्रकारचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)