टपऱ्यांच्या अतिक्रमणांमुळे वाहने रस्त्यावर

साताऱ्यातील वाहनतळाची स्थिती : नागरिकांना नाहक त्रास

सातारा – शहरात रस्त्यावर टपऱ्यांच्या अतिक्रमणांचा विषय आता फारसा नवीन राहिला नाही. मात्र, आता बंद पडलेल्या टपऱ्या चक्क वाहनतळात आणून टाकल्यामुळे वाहने परिसरातील रस्त्यावर दुतर्फा लावण्यात येत आहेत. परिणामी येणाऱ्या- जाणाऱ्या वाहनधारकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

राजवाडा चौपाटी नजिक पालिकेचे अधिकृत वाहनतळ आहे. परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या वाहनधारकांना त्या ठिकाणी पार्किंग करण्यात यावे या हेतूने वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी भाडोत्री वाहनांनी तळ ठोकलेला असताना आता त्या ठिकाणी राजवाडा चौपाटी परिसरातील बंद पडलेल्या टपऱ्या वाहनतळामध्ये आणून टाकल्या आहेत. त्यामुळे यापुर्वी त्या ठिकाणी लागणारी भाडोत्री तसेच खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांच्या रांगा तळासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला लागलेल्या दिसून येतात.

-Ads-

परिणामी रस्त्यावर त्या वाहनांचे अतिक्रमण होत असल्यामुळे सकाळी व सायंकाळच्या सुमारास त्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे पालिकेने तळामध्ये आणून टाकलेल्या टपऱ्या तात्काळ हटविण्याची आणि रस्त्यावर दुतर्फा वाहने लावणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)