फटाक्‍यांपेक्षा वाहनांमुळे अधिक प्रदूषण होत असावे-सर्वोच्च न्यायालय 

नवी दिल्ली – फटाक्‍यांपेक्षा वाहनांमुळे अधिक प्रदूषण होत असावे असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने व्यक्‍त केले आहे. फटाके आणि वाहने यांनी होणाऱ्या प्रदूषणाचा तुलनात्मक अभ्यास केला आहे का? असा प्रश्‍नही न्यायमूर्ती एस ए बोबडे आणि एस ए नझीर यांच्या खंडपीठाने फटाक्‍यांमुळे प्रदूषण होते म्हणून फटाक्‍यांची निर्मिती आणि विक्री यावर पूर्ण बंदी घालावी यासाठीच्या याचिकेवर सुनावणी करताना केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ए एन एस नाडकर्णी यांना केला.

फटाका निर्मिती उद्योगावर बंदी आणल्यामुळे त्या उद्योगातील लोकांवर आणि फटाक्‍यांची विक्री करणाऱ्या व्यवसायातील लोकांवर ओढवणाऱ्या बेकारीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तुम्ही या लोकांना त्यांच्या आणि त्यांच्या कुटुबांच्या उदरनिर्वाहासाठी पैसे देऊ शकत नाही आणि तुम्ही त्यांना बेकार करून उपाशी राहण्यासाठी वाऱ्यावर सोडूू शकत नाही. फटाका उद्योगावर बंदी आणल्याने निर्माण होणारी बेकारी दूर करण्याबाबत काही उपाययोजना सांगावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

जर फटाके निर्मिती हा कायदेशीर व्यवसाय आहे आणि लोक परवाना घेऊन फटाका निर्मिती करतात. असे असताना त्यावर बंदी कशी आणता येईल? असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला. वाहनांमुळे अधिक प्रदूषण होत असूनही लोक फटाका उद्योगाच्या मागे लागल्याचे दिसत असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)