वरून गांधी काँग्रेसच्या वाटेवर ?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसने मोठा डाव खेळला आहे. प्रियांका गांधी यांची औपचारिकरीत्या राजकारणात एंट्री झाली असून त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, भाजपामध्ये नाराज असलेले वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत राहुल गांधींनी काही माहित नसल्याचे सांगितले. राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून काँग्रेस पक्षात मोठे बदल पाहायला मिळत आहेत.  प्रियंका गांधी राजकारणात सक्रीय होणे आणि आता वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा ? हे त्याचे उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरून गांधी भाजपवर नाराज आहेत, त्यांनी अनेकवेळा भाजप विरोधी भूमिका देखील घेतली आहे. तसेच खासदारांचा पगार, रोहिंग्या मुस्लिमांचा प्रश्न यावरून त्यांनी सरकार विरोधी भूमिका मांडली होती. आणि राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर वरून गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)