वरुण गांधींना ‘भक्कम’ आघाडी

उत्तर प्रदेशमध्ये यंदा भाजपतर्फे सुलतानपूर या लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून २०१४मध्ये मनेका गांधी यांचे पुत्र वरून गांधी यांना उमेदवारी देण्यात आली होती. ते येथून निवडून देखील आले होते मात्र यंदा भाजप पक्षश्रेष्ठीनी वरुण गांधींच्या सलतानपुरातून मनेका गांधींना तर मनेका गांधींच्या पिलभीत मतदारसंघातून वरुण गांधींना उमेदवारी जाहीर केली होती.

दरम्यान, आज देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असून त्यासाठी आज सकाळपासूनच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे वरुण गांधी उभा असलेल्या पिलिभीत लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा सामना सपाच्या हेमराज वर्मा यांच्याशी असून सध्या वरून गांधी यांनी चांगलीच आघाडी घेतल्याचं चित्र आहे.

सध्याच्या आकडेवारीनुसार ५२९,५७६ मतांसह वरुण गांधी या आघाडीवर असून त्यांच्यापाठोपाठ सपाच्या हेमराज वर्मा मतं मिळाली असून त्यांना ३१९,४७७ मतं मिळाली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)