टॉम क्रूझच्या सिनेमाप्रमाणे बनणार वरुण धवनचा “रणभूमी’ 

करण जोहरची निर्मिती, शशांक खेतानचे डायरेक्‍शन आणि लीड रोलमध्ये वरुण धवन असे समिकरण असलेल्या “रणभूमी’चे काम सध्या जोरात सुरू आहे. “रणभूमी’ नावाप्रमाणेच सिनेमा ऍक्‍शनपॅक्‍ड असणार आहे. वरुण धवनच्या “शुद्धी’मध्येच फेरफार करून “रणभूमी’बनवला जात आहे, असे पूर्वी ऐकायला मिळाले होते. करण जोहरच्याच निर्मितीखाली “शुद्धी’चे काम होणार होते. मात्र प्रारंभापूर्वीच हा सिनेमा रखडला होता. टॉम क्रूझच्या गाजलेल्या “मिशन इंम्पॉसिबल’वरच “रणभूमी’ आधारित असणार आहे.

वरुण धवनला पहिल्यांदाच पूर्णपणे ऍक्‍शन हिरोचा रोल करायचा आहे. यापूर्वी “जुडवा 2′ आणि अन्य काही सिनेमांमध्ये वरुण धवनने ऍक्‍शन सीन जबरदस्त केले होते. “रणभूमी’तील ऍक्‍शन सीनचे शुटिंग भारताबरोबर विदेशातही केले जाणार आहे. यामध्ये वरुणच्या बरोबरीने जान्हवी कपूर असणार आहे, असेही ऐकायला मिळाले आहे. असे झाले तर वरुण धवनला बॉलिवूडमधील टॉम क्रूझ म्हणायला लागेल. वरुणपेक्षा जॉन अब्राहम, अक्षय कुमार, हृतिक रोशन सारख्या सिनियर ऍक्‍टरना टॉम क्रूझची बरोबरी अधिक शोभून दिसू शकली असती. “रणभूमी’च्या शुटिंगला 2019 मध्ये सुरूवात होईल आणि कदाचित 2020 मध्ये तो रिलीज होईल अशी शक्‍यता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)