वरून धवन सध्या कलंक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामुळे वरूनला चाहत्यांना भेटायला वेळ मिळत नाही. यामुळे निराश झालेल्या महिला चाहतीने वरुनची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरून त्याच्या चाहत्यांना नेहमी आवर्जून भेट देतो. वरुनच्या घरासमोर त्याची एक चाहती त्याला भेटायला आली होती. परंतु, वरुनला भेटणे शक्य झाले नाही. बराच वेळ थांबूनही वरुनची भेट होत नसल्याने चिडून त्या चाहतीने स्वतःला मारण्याची धमकी दिली. मात्र काहीच प्रतिसाद न मिळाल्याने वरुनची गर्लफ्रेंड नताशाला जीवे मारण्याची धमकी दिली. याची गंभीर दाखल घेत त्या महिला चाहतीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.