वरुणने दिली वडिलांना जन्मदिनी खास भेट पाहा व्हिडिओ

नवीन पिढीतील आघाडीचा अभिनेता वरुण धवन हा सध्या यशराज बॅनरच्याखाली बनणाऱ्या ‘सुई-धागा(मेड इन इंडीया)’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत अनुष्का शर्मा दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १३ ऑगस्टला प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षक खूप पसंत करत आहेत.

या चित्रपटात वरुण एका टेलरच्या भूमिकेत आहे.  त्यात त्याचे नाव ‘मौजी’ असे आहे. चित्रपटात आणि त्याच्या जीवनात देखील वरुण मनमौजी स्वभावाचा आहे. त्याचे वडील डेव्हीड धवन यांचा १६ ऑगस्टला जन्मदिवस होता. त्यावेळी वरुणने चक्क आपल्या हाताने शिवलेला शर्ट त्याच्या वडिलांना भेट म्हणून दिला.

चित्रपटात आपल्या भूमिकेला यथोचित न्याय देता यावा म्हणून त्याने हे टेलरिंगचे काम शिकले होते. त्याने तो शर्ट तीन तासात शिवला आणि त्याचा एक व्हिडिओ देखील बनवून आपल्या इंस्टाग्राम खात्यावर अपलोड केला. त्याचा हा नवीन अवतार आणि त्याची वडिलांना दिलेली खास भेट याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)