“आरआरआर’मध्ये वरुण धवन आणि संजय दत्तची एंट्री!

सुपरहिट ठरलेल्या “बाहुबली’ चित्रपटाचे डायरेक्‍टर एस. एस. राजामौली यांच्या आगामी आरआरआर (रामा राज्य रावणम) चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगन यांची एंट्री कन्फर्म मानली जात आहे. त्यानंतर आता चित्रपटात बॉलीवूडमधील आणखी दोन कलाकारांना कास्ट करण्यात येणार असल्याचे समजते.

या चित्रपटात वरुण धवन आणि संजय दत्त यांना अप्रोच करण्यात आले होते. तसेच या दोन्ही कलाकारांनी प्रॉजेक्‍टसाठी होकारही दर्शविला होता. मात्र, त्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. दरम्यान, चित्रपटाची शूटिंग पुण्यात सुरूही करण्यात आली आहे. “आरआरआर’ चित्रपट जुलैमध्ये चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे. “बाहुबली’च्या पहिल्या आणि दुस-या भागाला मिळालेल्या बंपर यशामुळे चाहत्यांना या चित्रपटाबाबत खूपच उत्सुकता आहे.
“आरआरआर’ एक फिक्‍शनल कथा असून ती स्वातंत्रता सेनानी अल्लूरी सीतारामा राजू आणि कोमाराम भीम यांच्या जीवनावर आधारित आहे. देशाला स्वातंत्र मिळण्यापूर्वी 1920मध्ये दिल्लीत घडलेला घटनाक्रम यात दाखविण्यात येणार आहे.

दरम्यान, राजामौली यांच्या चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगनसह साउथ सुपरस्टार रामचरण तेजा, ज्यूनियर एनटी रामाराव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)