वरुण आणि नताशाचे लग्न मालदिवमध्ये

वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा लवकरच विवाह बंधनात बांधले जाणार आहेत. त्यांच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू आहे. आपले लग्न खूप धुमधडाक्‍यात व्हावे, अशी नताशाची ईच्छा आहे. त्यामुळे त्यांनी खास वेडिंग डेस्टिनेशन निवडले आहे. त्यासाठी तिने मालदिवला पहिली पसंती दिली आहे. मालदिवच्या बीचच्या परिसरामध्ये त्यांना सेलिब्रेशनसाठी आवडतील अशी बरीच ठिकाणे आहेत. त्यामुळे त्यापैकीच एका ठिकाणाची निवड होण्याची शक्‍यता आहे. पण वरुण आणि नताशाच्या घरच्यांना हे लग्न भारतातच व्हावे असे वाटते आहे.

वरुण आणि नताशा लहानपणापासूनचे मित्र आहेत. तरुणपणी एका युथ कॉन्सर्टमध्ये त्यांची पुन्हा भेट झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. वरुणने आपली ही गर्लफ्रेंड बऱ्याच दीर्घ काळापासून लाईमलाईटपासून लपवून ठेवली होती. तिच्या वाढदिवशी त्याने खास अंदाजात तिला शुभेच्छा दिल्या. सोनम कपूरच्या लग्नामध्ये पहिल्यांदा या दोघांना एकत्र बघितले गेले होते. नेहा धुपियाच्या शो मध्ये वरुणने आपल्या नात्याविषयी एक पुसटशी कल्पना दिली होती. त्यानंतर यांच्यातील घट्ट दोस्ती सगळ्यांना समजली. नताशा फॅशन डिजायनर आहे आणि तिने न्यूयॉर्कमधून फॅशन डिजायनिंगची डिग्री घेतली आहे.

-Ads-

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)