“वंदे भारत एक्‍स्प्रेस’ 15 फेब्रुवारीपासून धावणार 

नवी दिल्ली – बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड ट्रेन (ट्रेन-18) अर्थात “वंदे भारत एक्‍स्प्रेस’ येत्या 15 फेब्रुवारीपासून धावणार आहे. या रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखविणार आहे. ही ट्रेन दिल्ली ते वाराणसी मार्गावर धावणार आहे. ही एक्‍स्प्रेस दिल्ली ते वाराणसी हा प्रवास आठ तासात पूर्ण करणार आहे.

या एक्‍स्प्रेसचे दर निश्‍चित करण्यात आले असून वातानुकूलित चेयरसाठी 1 हजार 850 रुपये, तर एक्‍झीक्‍यूटिव्ह क्‍लाससाठी 3 हजार 520 रुपये आकारण्यात येणार आहे. यात प्रवासांना नाष्टाही मिळणार आहे. हे दर शताब्दी एक्‍स्प्रेसच्या तुलनेत दिडपट, तर प्रीमियम ट्रेनच्या प्रथम श्रेणीच्या तुलनेत दुप्पट आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)