मावळात ‘वंचित’ तिसऱ्या क्रमांकावर

तब्बल 75 हजार 904 मिळाली मते

पुणे – मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या राजाराम पाटील या उमेदवाराने तिसऱ्या क्रमांकाची 75 हजार 904 मते मिळविली.

प्रकाश आंबेडकर यांनी नव्याने वंचित बहुजन आघाडी स्थापन करुन लोकसभा निवडणूकामंध्ये या पक्षांकडून उमेदवारीही देण्यात आली. मावळातून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. याची आपल्या पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवून चांगली मते मिळविली आहेत.

बहुजन समाज पक्षाच्या ऍड. संजय कानडे यांना चौथ्या क्रमांकाची 10 हजार 197 मते मिळाली आहेत. क्रांतिकारी जय हिंद सेनेच्या जगदीश सोनवणे यांना 5 हजार 242 मते मिळाली आहेत. आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडियाच्या जया पाटील यांना 2 हजार 328, भारतीय नवजवान सेना पक्षाच्या प्रकाश महाडिक यांना 1 हजार 95, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या मदन पाटील यांना 2 हजार 243, बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पक्षाच्या सुनील गायकवाड यांना 1 हजार 746 मते मिळाली.

अपक्ष उमेदवारांमध्ये अजय लोंढे यांना 1 हजार 63, अमृता आपटे यांना 1 हजार 702, नवनाथ दुधाळ यांना 6 हार 291, प्रशांत देशमुख यांना 3 हजार 600, बालकृष्ण घरत यांना 3 हजार 600, राकेश चव्हाण यांना 3 हजार 219, राजेंद्र काटे यांना 1 हजार 639, विजय रंदिल यांना 2 हजार 91, सुरज खंडारे यांना 1 हजार 877, सुरेश तौर यांना 1 हजार 73, डॉ.सोमनाथ पोळ यांना 1 हजार 97 मते मिळाली आहेत.

श्रीरंग बारणे यांना टपालीमध्ये 338 मतांची आघाडी
मावळ लोकसभा निवडणुकीसाठी टपाली (पोस्टल) पद्धतीने झालेल्या मताची आकडेवारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जाहीर केली. यात शिवसेनेचे विजयी उमेदवार श्रीरंग बारणे यांना 1 हजार 713 मते मिळाली. तर पार्थ पवार यांना 1 हजार 375 मते मिळाली आहेत. बारणे यांनी टपाली मतांमध्ये 338 इतकी आघाडी घेतली आहे.

टपाली मतदान एकूण 3 हजार 357 इतकी झाली. त्यात 32 “नोटा’चा समावेश आहे. तर तब्बल 584 मते रद्दबातल ठरली आहेत. टपाली मतदान झालेल्या मतांची संख्या 3 हजार 335 इतकी आहे. पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिपंरी या सहा विधानसभा मतदारसंघात एकही मते रद्द झालेले नाही. मात्र, टपाली मतदानातच रद्दबातल ठरलेल्या मते सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच टपाली पद्धतीत तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 191 मते मिळाली आहेत. दरम्यान, पोस्टलमध्ये रद्द झालेल्या मतांची संख्या जास्त असल्याने त्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत होती.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)