वंचित बहुजन आघाडीत औरंगाबादच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

पुणे : लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या असताना वंचित बहुजन आघाडीने आपले महाराष्ट्रातील ३७ उमेदवार जाहीर केले आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीची जागा ही प्रकाश आंबेडकरांनी बी. जी. कोळसे पाटील यांना सोडल्यानंतर आता नवा वाद सुरू झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा स्थानिक असायला हवा, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होताना दिसतेय.

-Ads-

तसेच एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “औरंगाबाद येथून कोणीही लढा पण उमेदवार हा स्थानिक असायला हवा होता. स्थानिक उमेदवार असल्यास त्याचा वंचित बहुजन आघाडीलाच फायदा होईल. पुढे बोलताना ते म्हणाले की, बी.जी. कोळसे पाटील हे शिक्षित आहेत, उच्च न्यायालयातील न्यायधीश आहेत पण त्याचा औरंगाबादमधील जनेतशी संपर्क नाही”.

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)