ग्वालियर – आग्रा – झांशी रस्त्यावर दोन ट्रकच्यामध्ये एक व्हॅन चिरडली गेल्याने त्यात एकाच कुटुंबातील सात जण ठार झाल्याची घटना आज येथे घडली. या अपघात अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. त्या रस्त्यावरील टोल नाक्यावरच हा प्रकार घडला. या टोल नाक्यावर रांगेत उभ्या असलेल्या ट्रकच्या मागे ही व्हॅन थांबली असताना त्याला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
अपघातग्रस्त कुटुंब मेहंदीपुरच्या बालाजी मंदिरात दर्शन घेऊन आपल्या दब्रा गावाकडे परतत होते. ठार झालेली मंडळी मंगलिया जातव यांच्या कुटुंबातील होती. चाळीस वर्षीय जातव हेही या अपघातात ठार झाले आहेत.