‘व्हॅलेंटाईन डे’ला हिंदुत्ववादी संघटनांनी अडविल्यास कामदिवस साजरा करत असल्याचे सांगा – शशी थरूर 

नवी दिल्ली – संपूर्ण जगभरात आज ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जात आहे. भारतातही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु, काही हिंदुत्ववादी संघटना संस्कृतीच्या नावे समाजात विरोध दर्शवितात. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी हिंदुत्ववादी संघटनांवर निशाणा साधला आहे.

शशी थरूर यांनी व्हॅलेंटाईन डेच्या देताना म्हंटले कि, जर संघ परिवाराने तुम्हाला आज तुम्हाला ट्रोल केले किंवा मित्र- मैत्रिणींसोबत बाहेर न फिरण्याची धमकी दिल्यास त्यांना सांगा की तुम्ही पारंपारिक कामदिवस साजरा करत आहात, असे त्यांनी सांगितले.

यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी  शशी थरूर यांना लव्हगुरू म्हंटले आहे. ते म्हणाले कि, शशी थरूर तर लव्हगुरूर आहेत. कोणीही व्हॅलेंटाईन डेला धमकी दिल्यास लव्हगुरू त्याचा विरोध करेल, असे त्यांनी म्हंटले आहे.

https://twitter.com/ANI/status/1095913609581002752

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)