वढेरांची चौकशी राजकीय दृष्ट्या प्रेरित : ममता 

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज सक्त अंमलबजावणी संचालनालयाकडून सुरु असलेली रॉबर्ट वढेरा यांची चैकशी राजकीय दृष्ट्या प्रेरित असल्याचं म्हंटलं आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांची सध्या जयपूर येथील एका जमीन घोटाळ्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून सक्त अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे.

आम आदमी पक्षाकडून उद्या दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या विरोधी पक्षांच्या सभेला हजेरी लावण्यासाठी आज ममता बॅनर्जी कोलकाता विमानतळावरून दिल्लीकडे रवाना झाल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना, “भारतीय जनता पक्ष हा सध्या देशभरामध्ये विरोधी पक्ष आणि त्यांच्या नातलगांवर ‘ईडी’द्वारे कारवाईचे पाऊल उचलत असून त्यांचा असे वागण्या मागचा उद्देश हा लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांपुढे संकटं उभी करण्याचा आहे.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)