वढेरांच्या अटकपूर्व जामीनाला मुदतवाढ

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांना ‘मनी लॉंडरिंग’ प्रकरणी देण्यात आलेल्या अटकपूर्व जामिनाला आज 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वढेरा यांनी तपासकामात सहकार्य करावे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. वढेरा यांच्या चौकशीसाठी त्यांच्या कोठडीची आवश्‍यकता असल्याचे “ईडी’च्या संचालनालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतर न्यायलयाने वढेरा यांच्या जामिनाला मुदतवाढ दिली. विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी वढेरा यांना हा दिलासा दिला आहे.

लंडनमधील 12 ब्रियान्स्टोन स्क्वेअरमधील 1.9 दशलक्ष पौंडांची मालमत्ता खरेदी प्रकरणी वढेरा यांच्याविरोधात तपास सुरू आहे. त्यासंदर्भातील “मनी लॉंडरिंग’ प्रकरणी वढेरा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांच्या या जामिनाला न्यायालयाने 16 फेब्रुवारी रोजी आजपर्यंत मुदतवाढ दिली होती.

लंडनमधील वढेरा यांच्याशी संबंधित आणखी काही मालमत्तांची माहिती मिळाली असून त्यामध्ये 5 आणि 4 दशलक्ष पौंड किंमतीची दोन घरे, 6 अन्य फ्लॅट आणि अन्य मालमत्तांचा समावेश आहे, असे “ईडी’ने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)