लसीकरण : विरोध घातक ठरेल (भाग 2)

-डाॅ. जयंत जाधव

लसीकरण : विरोध घातक ठरेल (भाग 1)

नुकतीच एक बातमी वाचली. फ्रान्समध्ये मुलं दोन वर्षांची होईपर्यंत त्यांना 11 वेगवेगळ्या लसी दिल्या पाहिजेत असा कायदा केलाय. त्याआधी इटलीनेही असाच कायदा केला. युरोपिय देशांना असे कायदे करावे लागण्याचं कारण या देशांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला पालकांचा विरोध आहे! अमेरिकेतही हेच होतंय. सक्तीचं लसीकरण म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे असं पालकांना वाटतंय. तीन ते पाच रोगांच्या लसी एकत्रितपणे देणं मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही असंही काहींना वाटतंय तर लसीकरणामुळे फक्त औषध कंपन्यांची भर होते असं काहींचं मत!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेकफील्डचे निष्कर्ष तपासून पाहण्यासाठी अनेक डॉक्‍टर सरसावले, पण यापैकी कुणालाही चचठ लसीचा ऑटिझमशी संबंध सिद्ध करता आला नाही. याच सुमारास एका पत्रकाराने चचठ वर बंदी आणली असती तर वेकफील्डला एका पेटंटच्या माध्यमातून मोठं घबाड हाती लागण्याची शक्‍यता होती असं सांगितलं. सुमारे 12 वर्षांनी लॅनसेटने तो पेपर मागे घेतला. ब्रिटिश मेडिकल काउंसिलनेही नंतर वेकफील्डवर बंदी घातली, पण व्हायचं ते नुकसान होऊन गेलं होतं. लहान मुलांच्या पालकांच्या मनात चचठ विषयी अढी बसलीच.

समाजमाध्यमांनी चुकीची माहिती पसरायला हातभार लावला आणि या सगळ्याचा दृष्य परिणाम म्हणजे गेल्या काही वर्षांत युरोप आणि अमेरिकेत ठिकठिकाणी उद्‌भवलेल्या साथी. एकट्या अमेरिकेत 2017 मध्ये इन्फ्लुएन्झामुळे मरण पावलेल्या लहान मुलांपैकी 80% मुलांना लसीकरण केलं गेलं नव्हतं. शिवाय एकाला झालेल्या लागणीमुळे शारीरिकदृष्ट्‌या दुर्बल लोकांना लागण होण्याची वाढती शक्‍यता.

गोवर हाही साथीचा रोग. काही मुलांना इतर रोगांमुळे लस देणं शक्‍य नसतं. अशा मुलांना इतरांमुळे गोवर झाला तर तो जीवघेणा ठरू शकतो. तसंच रुबेलाची लागण लहान मुलांसाठी फार धोकादायक नसते, पण गर्भवती महिला रुबेला संसर्ग झालेल्या मुलाच्या संपर्कात आल्यास गर्भपात, मृत किंवा मतिमंद मूल जन्माला येण्याची शक्‍यता वाढते. म्हणजे हा प्रश्‍न फक्त व्यक्तिस्वातंत्र्याचा नसून इतरांच्या जगण्याच्या अधिकाराशी संबंधित आहे.

एकापेक्षा अधिक रोगांच्या लसी एकत्र टोचणं लहान मुलांना हानिकारक असल्याचं काहींचं मत आहे; परंतु अशा मताला शास्त्रीय आधार नाही. शिवाय लसी एकत्र टोचल्यामुळे मुलांना वारंवार सुया टोचाव्या लागत नाहीत आणि पालकांनाही मुलांसाठी परत परत दवाखान्यात यावं लागत नाही हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे.

राहता राहिला प्रश्‍न औषध कंपन्यांच्या नफ्याचा! औषध कंपन्यांना नफा होतो म्हणून कुणी औषधं घ्यायचं बंद केलेलं नाही. मग लसीकरणाला विरोध का? समाजमाध्यमांतून पसरणाऱ्या गैरसमजांना वेळीच आळा घातला गेला पाहिजे. हे लोण भारतात यायला वेळ नाही लागायचा. त्यासाठी समाजमाध्यमांचाच उपयोग कल्पकतेने करण्याची एखादी स्पर्धा भारतात ठेवावी का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)