लसीकरण : विरोध घातक ठरेल (भाग 1)

-डाॅ. जयंत जाधव

नुकतीच एक बातमी वाचली. फ्रान्समध्ये मुलं दोन वर्षांची होईपर्यंत त्यांना 11 वेगवेगळ्या लसी दिल्या पाहिजेत असा कायदा केलाय. त्याआधी इटलीनेही असाच कायदा केला. युरोपिय देशांना असे कायदे करावे लागण्याचं कारण या देशांमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाला पालकांचा विरोध आहे! अमेरिकेतही हेच होतंय. सक्तीचं लसीकरण म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला आहे असं पालकांना वाटतंय. तीन ते पाच रोगांच्या लसी एकत्रितपणे देणं मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित नाही असंही काहींना वाटतंय तर लसीकरणामुळे फक्त औषध कंपन्यांची भर होते असं काहींचं मत!

लसींना होणारा विरोध नवा नाहीये. एडवर्ड जेन्नरने 1796 मध्ये पहिली देवीची लस तयार केली. त्यावेळपासून लसीकरणाला विरोध होतोच आहे. त्यावेळची कारणं मुख्यतः धार्मिक किंवा नव्या विचारांना विरोध या स्वरूपाची होती. लसीमुळे रोगप्रतिबंध होऊ शकतो यावर लोकांचा विश्‍वास बसत नव्हता. नंतर आलेल्या रेबीज, पोलिओ आणि त्रिगुणी (घटसर्प-डांग्या खोकला-धनुर्वात) लसींनाही लोकांनी विरोध केलाय. या लसींमुळे फारसा फायदा होत नाही, उलट नुकसानच होतं असा सूर वैद्यकीय जगातून कितीतरी लसींबाबत उमटला होता. लसीच्या शोधानंतर लगेच असं विरोधी मत समजण्यासारखं आहे. पण ओरल पोलिओ व्हॅसिन्स जझत (पोलिओची तोंडावाटे द्यायची लस) किंवा मिम्स-मिझल्स-रुबेला चचठ (गोवर-गालगुंड-रुबेला) या लसींना खूप वर्षांनंतर परत विरोध होतो तेव्हा त्याची कारणं अनेक पदरी असतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओच्या उच्चाटनाचा कार्यक्रम हाती घेतला तेव्हा पोलिओपीडीत देशांमधील सर्व मुलांना एकाच दिवशी पोलिओची लस द्यायची असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरच्या तालिबानी वर्चस्व असलेल्या भागांमध्ये पोलिओ पाजण्याच्या निमित्ताने तालिबान्यांचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला जाईल, या भीतीमुळे पोलिओची लस देणे धर्माच्या विरुद्ध आहे असा प्रचार केला गेला होता. याशिवाय उपलब्ध पोलिओ लसीच्या दर्जाबद्दलही शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या.

खूपदा धार्मिक किंवा शास्त्रीय मुलाम्यामागची कारणं राजकीय नसली तर आर्थिक असतात. चचठ लसीबाबत असाच प्रकार घडल्याचं वृत्तपत्रं आणि इतर नियतकालिकांनी छापलेल्या लेखांवरून दिसतं. चचठ लस स्थिरावल्यानंतर सुमारे तीस वर्षांनी, अँड्रयू वेकफील्ड या ब्रिटिश डॉक्‍टरने, चचठ लसीमुळे लहान मुलांना पोटाचे विकार आणि ऑटिझम हा मज्जासंस्थेशी संबंधित विकार होण्याची शक्‍यता वाढते, अशा आशयाचा एक पेपर लॅनसेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध केला. त्यामुळे जगभर खळबळ उडाली.

लसीकरण : विरोध घातक ठरेल (भाग 2)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)