सुषमा स्वराज यांच्यासमोर विदेशी महिलेने गायले ‘राज कपूर’ यांचे गाणे

नवी दिल्ली – काही दिवसापूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक आॅस्ट्रोलियन व्यक्ती भोजपूरीमध्ये बोलत होता. तसेच एक चीनी मुलगी चक्क तमिळ बोलत असल्याचा व्हिडीओ देखील शेअर झाला होता. अगदी तसाच एका व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक विदेशी महिला ही भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासमोर बिनधास्तपणे राजकपूर यांच्या चित्रपटातील गाणे गात आहे. हे पाहून सगळेच अंचबित झाले आहेत.

सुषमा स्वराज या सध्या कजाकिस्तान, किर्गिजस्तान आणि उज्बेकिस्तान  या तीन देशाच्या दौऱ्यावर आहेत. उज्बेकिस्तान मध्ये त्यांची भेट एका महिलेशी झाली, ती उज्बेकिस्तानी महिला देशी अंदाजात सुषमा स्वराज यांच्यासमोर ‘राज कपूर’ यांच्या ‘श्री 420’ या चित्रपटातील गाणे ‘इचक दाना बीचक दाना’ गाताना दिसत आहे.

-Ads-

हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिसत आहे की, सुषमा स्वराज विदेशी महिलेच्या गळ्यात हात घालून उभी आहे आणि उज्बेकिस्तानी महिला गाणे गात आहे. या व्हिडीओला परराष्ट्र मंत्रालयचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी अपलोड केले आहे.

व्हिडीओ पहा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)