उत्तरप्रदेशात फराक्का एक्‍स्प्रेस घसरली; 7 ठार 35 जखमी 

रायबरेली: उत्तरप्रदेशातील हरचंदपुर रेल्वे स्टेशन जवळ फराक्का एक्‍स्प्रेसचे नऊ डबे रूळावरून घसरून झालेल्या दुर्घटनेत सात जण ठार तर 35 जण जखमी झाले. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमाराला हा अपघात झाला. या एक्‍स्प्रेसचे नऊ डबे रूळावरून घसरल्याचे निदर्शनास आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपये तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख रूपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे. या गाडीचे डबे रूळावरून घसरून एकमेकांवर चढल्याने आतील प्रवाशांची माहिती मिळवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. हे डबे दूर करून आत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी घटनास्थळी हायड्रोलिक्‍स व गॅस कटर्स मागवण्यात आले होते. ही गाडी पश्‍चिम बंगाल मधील मालडा येथून नवी दिल्लीकडे जात होती.
या घटनेचे वृत्त कळताच रेल्वेने रिलिफ व्हॅन घटनास्थळी पाठवली त्यात आवश्‍यकत्या औषधोपचाराच्या साठ्यासह सात डॉक्‍टरांचे पथकही तिकडे रवाना करण्यात आले. त्यांनी काहीं जखमींवर जागेवरच उपचार करून त्यांना पुढील उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले.अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या ठप्प झाल्या. दुपारी उशिरापर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले आहे. या रेल्वेतील अन्य प्रवाशांना वाहनांनी लखनौला नेण्यात आले आणि तेथून त्यांना दिल्लीला नेण्यासाठी रेल्वेने विशेष डब्यांची व्यवस्था केली. प्रवाशांच्या माहितीसाठी रेल्वेने हेल्पलाईनचीही व्यवस्था केली होती. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनीही राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना रेल्वेला या कामी सर्व प्रकारची मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य सरकारची यंत्रणाही रेल्वे अधिकारी आणि प्रवाशांना मदत करीत आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)