उत्तराखंडमध्ये ‘केदारनाथ’वर बंदी..

सारा अली खान आणि सुशांत सिंग राजपुत यांची भूमिका असलेला केदारनाथ 7 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. मात्र उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांना राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी दिली आहे. जिल्ह्यात शांतता आणि सुवस्था राखण्यासाठी या चित्रपटावर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या चित्रपटावर आहे.

मुस्लिम धर्मीय पिठ्ठू आणि हिंदू मुलगी यांची प्रेमकहाणी केदारनाथमध्ये दाखवण्यात आली आहे. ही प्रेमकहाणी नसून यात ‘लव्ह जिहाद’चा प्रचार करण्यात आला आहे असाही आरोप आहे. त्याचप्रमाणे केदारनाथ ही हिंदु धर्मीयांची पवित्र जागा असून याच ठिकाणी चित्रपटातील काही आक्षेपार्ह दृश्‍यही चित्रित करण्यात आली आहेत असे म्हणत अनेकांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. केदारनाथच्या प्रदर्शनाला आक्षेप घेणारी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सिनेमा रिलीज होण्याच्या एक दिवस आगोदरच फेटाळून लावली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)