उत्तर प्रदेशच्या विभाजनाची आवश्‍यकता नाही : राजनाथ सिंह

लखनौ: उत्तर प्रदेशचे चार स्वतंत्र राज्यांमध्ये विभाजन करण्याची काहीही आवश्‍यकता नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेशात साधन संपत्तीचा तुटवडा नाही. त्यामुळे त्याचे चार राज्यांमध्ये विभाजन करण्याची आवश्‍यकता नाही, असे राजनाथ सिंह म्हणाले. उत्तर प्रदेशच्या विभाजनासंदर्भात नागरिकांकडून दीर्घकाळापासून मागणी करण्यात येत असून या मागणीच्या पाठपुराव्यासाठी आंदोलन सुरू केले जाण्याची घोषणा आम आदमी पार्टीने सप्टेंबर महिन्यात करण्यात आली होती. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली.

“विभाजन केल्याशिवाय उत्तर प्रदेशचा विकास होणार नाही, असे म्हटले जात आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेला चीननंतर भारत आहे. त्यामुळे उद्या जर कोणी विकासासाठी देशाच्या विभाजनाची मागणी करू शकेल.’ असे राजनाथ सिंह म्हणाले. उत्तर प्रदेश गौरव सन्मान समारंभामध्ये ते बोलत होते. राज्याच्या विकासासाठी वाढती लोकसंख्या हा अडथळा समजला जाऊ नये, असेही ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यापूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील “एनडीए’सरकारने उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यांचे विभाजन करून
झारखंड, उत्तराखंड आणि छत्तीसगड या तीन राज्यांची निर्मिती केली होती. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा आहेत. लोकसभेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्यापासून उत्तर प्रदेशचे विभाजन करून हरित प्रदेश, पूर्वांचल, बुंदेलखंड आणि अवध अशी चार राज्ये केली जावी, अशी मागणी गेल्या काही काळापासून वाढू लागले आहे. बसपा नेत्या बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी या मागणीचा जोरदार आग्रह धरला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)