उत्कटासन – गॅसेसचा त्रास कमी करणारे

हे बैठक स्थितीला एक आसन आहे. बैठक स्थितीत गुडघे दुमडून बसावे. आपण शौचाला जसे बसतो त्या पद्धतीने बसावे. नंतर टाचा जमिनीवर वर उचलाव्यात. फक्‍त पावलांवरती बसावे. नितंब दोन्ही पायांच्या हाडांजवळ सावधपणे शरीर स्थिर करून ठेवावे.

दोन्ही हातांचे पंजे एकमेकात गुंफावे आणि गुडघ्यावरती सहजपणे ठेवावेत. दृष्टी समोर ठेवावी. हे एक तोलात्मक आसन आहे. हे करताना आपण पंजावर उभे राहून पायाच्या टाचा जमिनीपासून अलग ठेवत असल्यामुळे तोल जाण्याची शक्‍यता असते.

या आसनामुळे गॅसेसचा त्रास कमी होतो. हात-पाय मजबूत होतात. शौचास साफ होते. शरीरात स्फूर्ती होते. योनीरोग दूर होतात. पुरुषांची संभोग शक्‍ती वाढते. वीर्यवाहिन्या शक्तिशाली बनतात. पोटाचे विकार दूर होतात. हे आसन साधारण एक मिनिटापर्यंत टिकवता येते.

नियमित सरावाने ते जमू शकते. सुरुवातीला 25 ते 30 सेकंद टिकते. नंतर मात्र 1 ते दीड मिनिटे टिकू शकते. मुख्यत्वे पुरुषांनी हे आसन नियमित करावे. उत्कटासनामुळे कामशक्‍ती योग्य पद्धतीने जागरुक होते. कामविकार बरे होतात. सोप्या पद्धतीने कामशक्‍ती वाढून शरीरामध्ये एक प्रकारची स्फूर्ती निर्माण होते.

तसेच या आसनामुळे गॅसेसचे प्रमाण कमी होते. शरीरातील उत्सर्जन संस्था वेगाने व योग्य पद्धतीने कार्य करते. वीर्यवाहक नलिका मजबूत होतात. म्हणून पुरुषांनी नियमितपणे हे आसन करावे. हे आसन प्रौढ अवस्थेत गुडघ्याच्या विकारामुळे जमत नाही. तसेच गुडघ्यात वाकून टाचा उंचावून बसणे यामुळे पोटऱ्यांवर ताण येतो.

तसेच आपल्या उत्सर्जन संस्थेवर ताण आल्याने ज्यांना मूतखड्याचा त्रास होत असेल त्यांनी हे आसन रोज नियमित करावे. स्थूल व्यक्‍तींना हे आसन जमत नाही. गुडघ्यांवर ताण येतो या आसनात योगतज्ज्ञाचे मार्गदर्शन घ्यावे.

तसेच उत्कटासनाची प्रगत अवस्था म्हणजे एका पायावरती पूर्ण शरीर तोलून दुसरा पाय मांडीवर ठेवणे म्हणजेच दुसरा पाय वर घेऊन तोल साधणे होय.

ही तोलात्मकता आपण एकट्याने करून येणार नाही. योगतज्ज्ञाच्या देखरेखीखाली हे आसन करावे. उत्सर्जनसंस्था चांगल्या प्रकारे कार्यान्वित होते. शौचाचे, अपचनाचे विकारही दूर होतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)