कॉलेज जीवनातील उपयुक्‍त “टूल्स”

आशिष जोशी

गॅझेटचा वापर ही आता सर्वसाधारण बाब बनली आहे. मग शाळा असो किंवा कॉलेज असो, आजकालचा विद्यार्थी गॅझेटशिवाय आपल्याला दिसत नाही. आयपॅड, लॅपटॉप, टॅब यासारख्या गॅझेटचा वापर करून विद्यार्थी आपले शालेय किंवा अन्य कामे मार्गी लावतात. गॅझेट सुरक्षित रहावे आणि दीर्घकाळ टिकावे याची सर्वचजण काळजी घेत असतात. मात्र, आणखी अशी काही गॅझेट, टूल आपल्याला सांगता येतील, की ते विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरू शकतात.

लॅपटॉप लॉक: कॉलेजमध्ये किंवा कामाच्या निमित्ताने लॅपटॉप अनेकांना सतत बाळगावा लागतो. लॅपटॉप आणि लॅपटॉपमधील डेटा सुरक्षित राखणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण लॅपटॉपवर काम करताना काही कारणाने जागा सोडून अन्य ठिकाणी गेलो तर सायबर गुन्हेगार त्याचा फायदा उचलू शकतात. अशा स्थितीत सिक्रेट कोडचा वापर करून डेटा सुरक्षित ठेऊ शकतो तसेच सिक्‍युरिटी केबलचाही उपयोग करता येतो.

बहुपयोगी केबल: प्रत्येक वेगवेगळ्या कामासाठी वेगळी केबल असणे आणि बाळगणे ही बाब कठीण आहे. कधी कधी गडबडीत एखादी केबल विसरली किंवा राहिली तर काम खोळंबण्याची शक्‍यता असते. अशा स्थितीत बहुपयोगी केबलचा वापर केला तर अन्य केबलचा वापर करण्याची गरज नाही. त्याचे महत्त्व लक्षात घेता सर्वव्यापी (यूबिक्‍यूटिअस) ऑल इन वन केबलची मागणी वाढली आहे.

फिटनेस ट्रॅकर: आपण जर व्यायाम, खेळात रुची ठेवत असाल तर मोबाइलवर फिटनेस ट्रॅकर ऍप डाऊनलोड करावा. आपल्या व्यायामामुळे होणाऱ्या बदलाची माहिती हा ट्रॅकर वेळोवेळी देईल. फिटनेस ट्रॅकर हे आपल्या फिटनेससंबंधीच्या बाबी ट्रॅक करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.

व्हॅक्‍युम ट्रॅव्हल मग: प्रवासात चहा, कॉफी, ज्युस पिण्यासाठी व्हॅक्‍युम ट्रॅव्हल मग हा उपयुक्त आहे. तो हाताळण्यास अत्यंत सोपा आहे. एका हाताने उघडता येतो आणि बंदही करता येतो. तसेच कप धुण्यासाठीही फारसा त्रास होत नाही. पातळ पदार्थ स्थिर ठेवण्याचे काम हा मग करतो. कारण प्रवासात जलपान, चहापान करताना अंगावर सांडण्याची भीती असते. पण ट्रॅव्हल मग आपले काम सोपे करतो. कॉफी थंड किंवा गरम ठेवण्याचे काम हा मग करतो. सिलबंद आणि रबरची ग्रीप असलेला मग हा प्रवासातील आदर्श कप मानता येईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)