सेंद्रिय शेतीनंतर आता योगिक शेतीचाही प्रयोग 

ब्रह्मकुमारी परिवाराकडून निरोगी शेतकरी व रोगमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी जागृती अभियान 

राजेंद्र वारघडे 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पाबळ  – रासायनिक खताच्या भडीमारातून मोठ्या प्रमाणात रोगांना आमंत्रण मिळत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. तयामुळे सेंद्रिय शेतीचा प्रयोग जोर धरू लागला. यावर कडी करताना ब्रह्मकुमारी परिवारातर्फे “योगिक’ शेतीचा नवा संशोधन प्रकल्प पुढे येत आहे. या माध्यमातून निरोगी शेतकरी व रोगमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी जागृती अभियान सुरू केले आहे.

पाबळ येथील ब्रह्मकुमारी विद्यालयात झालेल्या अभियानात या यशस्वी प्रयोगाच्या स्वानुभवाचे फलित ब्रह्मकुमार दत्ताभाई, रघुनाथभाई या अक्कलकोट व सोलापूर येथून आलेल्या या दोन साधकांनी ही संकल्पना स्पष्ट करताना हा दुग्धशर्करा योग मांडताना “योगिक शेती’चे सार्वजनिक महत्त्व निर्विवादपणे मांडून उत्तम शेतीच होणार हे भाकीतही वर्तवले आहे. मुळात रासायनिक खतातून बिघडलेला जमिनीचा पोत जागेवर येण्यासाठी खताच्या माध्यमातून थोडा थोडा बदल करणे गरजेचे आहे, हे ओळखून सर्वप्रथम शेतकरी कुटुंबाने वाटपासून सुरुवात करताना ठराविक क्षेत्रात पूर्ण योगिक (सेंद्रिय खते व आध्यात्मिक साधना) या माध्यमातून स्वतःला व्याधीमुक्त करताना गरजेचे उत्पादन सुरु करायचे.

यासाठी योगिक शेतीसाठीचे तंत्रज्ञान देऊन त्यांना निरोगी करताना इतर क्षेत्रात रसायानिक खतांचे प्रमाण कमी करत इतर शेती योगिक शेतीप्रयोगात आणायची अशी ही संकल्पना आहे. हे करताना काही साधकांनी अशा प्रकारच्या प्रयोगातून झालेले लाभ, निरोगी कुटुंब, खर्च व पाण्याची बचत करून तुलनात्मक आकडेवारी सादरही केली. यातून या परिवाराचे सदस्य आपली शेती योगिक शेतीत परिवर्तीत करण्यात यशस्वी झाले आहेत.

पाबळ येथील दहा एकर क्षेत्र असलेल्या ब्रह्मकुमारी परिवाराच्या अरुण रत्नपारखी या शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची माहिती दिली. त्यामध्ये रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन समान एकरातील बाजरी आणि सोयाबीन अशा पिकांची तुलनात्मक आकडेवारी दिली. यामध्ये रोग विरोधी औषधे न फवारता तब्बल 30 टक्के उत्पादन वाढले असल्याची माहिती पुराव्यासह दिली. शिवाय घरचे शुद्ध उत्पादनातून आरोग्यासाठी झालेला आजारविरहित जीवनाचा बोनसही सांगितला. 

 

शेणखताचा उपयोग करून, तण नाशके न वापरता घेतलेल्या पिकात किडीचे प्रमाण नगण्य राहते. उत्पादनातील वाढीपर्यंत तसे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. शासनही आता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देत असून रासायनिक खतांमुळे शेती व मानवाचे आरोग्यच धोक्‍यात आले आहे. त्यामुळे विषमुक्त धनधान्य उत्पादनासाठी सेंद्रिय उत्पादने किमान स्वतःच्या कुटुंबाला पुरेल इतकी घेत आरोग्यपूर्ण जीवनशैली कडे वाटचाल करायला हवी., 

एस. बी. भोसले, कृषी सहायक पाबळ 

 

भारतात या शेतीबाबत, मोठे शेतीक्षेत्र मूळ स्वरूपात येण्यासाठी शेतकरी वर्गाकडून हा विचारच स्वीकारला जात नाही. कारण परकीय राज्यकर्त्यांनी भारताला शेकडो वर्षे मागे नेले आहे. मात्र अजूनही वेळ गेली नाही. शेतातील मित्रांची साप, गांडूळ, उंदीर, फुलपाखरे, जनावरे यांची उपयुक्तता दुष्काळावर मात करण्यास आजही समर्थ आहे. 

दत्ताभाई व रघुनाथभाई, ब्रह्मकुमार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)