भारतीय विमान पाडण्यासाठी “एफ-16′ नव्हे तर “जेएफ- 17′ चा वापर ; पाक लष्कराकडून स्पष्टिकरण

इस्लामाबाद: भारतीयु हवाई दलाने बालाकोटमध्ये केलेल्या “एअर स्ट्राईल’नंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान भारतीय हवाई दलाचे विमान पाडण्यासाठी चीनबरोबर संयुक्‍तपणे विकसित करण्यात आलेल्या “जेएफ- 17′ या विमानाचा वापर करण्यात आल्याचे पाक लष्कराकडून सांगण्यात आले आहे.

भारताने केलेल्या “एअर स्ट्राईक’च्या दुसऱ्या दिवशी झालेल्या हवाई चकमकीदरम्यान भारताचे “मिग- 21′ हे लढाऊ विमान पाडण्यासाठी अमेरिकेच्या बनावटीचे “एफ-16′ विमानाचा वापर भारताविरोधात करण्यात आला नव्हता, असे पाक लष्कराचे प्रवक्‍ते मेजर.जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले.

दहशतवाद्यांच्याविरोधात “एफ-16′ विमानांचा वापर करण्यासाठी अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यान एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. हवाई चकमकीदरम्यान पाकिस्तानचे एक लढाऊ विमान भारतीय हद्दीत कोसळले होते. हे विमान म्हणजे मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता असलेले “एफ-16′ होते, असे या विमानाच्या अवशेषांच्या फोटोवरून उघड झाले होते. त्यावरून भारताविरोधात “एफ-16’विमानांचा वापर करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानवर होत होता. पाकिस्तानने “एफ-16′ विमानांच वापर कसा केला, याची चौकशी केली जाईल, असे अमेरिकेनेही म्हटले होते. त्या पार्श्‍वभुमीवर पाक लष्कराकडून्‌ आजचे स्पष्टिकरण देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)