ड्रोनचा वापर करून लंडनमध्ये विमान वाहतुकीला अडथळा

लंडन: लंडनच्या गॅटविक विमानतळानजिक ड्रोनचा वापर करून अनेक विमानांना विलंब करण्यास कारणीभूत असलेल्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्या या खोडसाळपणामुळे अनेक विमानांना विलंब झाला त्याचा हजारो प्रवाशांना फटका बसला.

तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की या दोन जणांनी गुन्हेगारी प्रवृत्तीतूनच हा प्रकार केला आहे. या आरोपींना काल अटक करण्यात आली. गॅटविक हा हिथ्रो नंतरचा लंडन मधील दुसरा सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे. तेथे गेल्या गुरूवारी पहिल्यांदा एक ड्रोन हवेत फिरताना दिसले. त्यानंतर दुसरेही ड्रोन तेथे खोडसाळपणे उडवण्यात आले. त्यामुळे जी विमाने रद्द करावी लागली किंवा ज्या विमानांना उशिर झाला त्याचा तब्बल 1 लाख 20 हजार प्रवाशांना फटका बसला. असे प्रकार रोखण्यासाठी आता व्यापक उपाययोजना हवाई वाहतूक क्षेत्राला हाती घ्यावी लागणार असून त्यादृष्टीने उपाययोजना सुरू आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)