भाजपाकडून फक्‍त मतांसाठीच छत्रपतींच्या नावाचा वापर- नवाब मलिक

File photo

छत्रपतींच्या नावाने जनतेची फसवणूक

मुंबई: महाराष्ट्रात भाजपची सत्ता येऊन साडेचार वर्षे झाली तरी या सरकारला स्मारकाचा आराखडा तयार करता आलेला नाही. एवढेच नव्हे तर या स्मारकाला अद्यापही केंद्राच्या पर्यावरण मंत्रालयाची परवानगी मिळालेली नाही, असे सांगतानाच छत्रपतींच्या नावाने हे सरकार जनतेची फसवणूक करीत आहे. केवळ मतांच्या राजकाराणांसाठी भाजप छत्रपतींच्या नावाचा वापर करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवस्मारकातील छत्रपतींचा पुतळा अश्वारूढ असावा किंवा उभा यावरून नवीन वाद सुरू झाला असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने सरकारवर टिकेची तोफ डागली. पत्रकारांशी संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याला मंजूरी दिली होती. स्मारक समुद्रात कुठे उभारावे ही जागाही निश्‍चित केली होती. परंतु, पर्यावरण मंत्रालयाची परवानगी न मिळाल्याने काम सुरु झाले नव्हते.

आघाडीचे सरकार जाऊन भाजपचे सरकार सत्तेवर आले. परंतु, साडेचार वर्षे झाली तरी या सरकारला स्मारकाचा आराखडा तयार करता आलेला नाही, महाराजांचा पुतळा कसा असावा हेही अद्याप निश्‍चित झालेले नाही, हे यावरून सिद्ध झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. स्मारकाला पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसताना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्याचा अट्टहास करण्यात आल्याचा आरोप करीत पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसल्याने आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्मारकाच्या कामाला स्थगिती देण्याची नामुष्की सरकारवर ओढावली असल्याचा टोलाही मलिक यांनी लगावला.

मेटेंचा जादूटोणा

शिवस्मारकासाठी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी नसताना पंतप्रधानांनी जलपूजन केले. त्यानंतर शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पुन्हा शिवस्मारकाच्या ठिकाणी कामाचा शुभारंभ करण्याचा अट्टहास धरल्याने तेथे बोटीला अपघात झाला. यातून धडा न घेतलेल्या मेटेंनी पुन्हा एकदा समुद्रात जाऊन स्मारकाच्या ठिकाणी जादुटोणा केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)