बाळाच्या नाजूक त्वचेसाठी वापरा ‘कोरफड’   

-डॉ. सुभाषिणी 

नवजात बाळाचे पालक म्हणून आपल्या लहानग्याला सर्व काही सर्वोत्तम पुरवावे, असेच तुम्हाला वाटते. अगदी स्वाभाविकच आहे ते! तुम्ही आपल्या बाळांसाठीची उत्पादने खूप काळजीपूर्वकच विकत घेत असता मात्र आजघडीला बाजारात बेबीकेअर उत्पादनांची इतकी गर्दी झाली आहे की योग्य निवड करताना गोंधळून जाणेही तितकेच स्वाभाविक आहे.

लहान बाळांची त्वचा ही प्रौढ व्यक्तींच्या त्वचेच्या तुलनेत खूप नाजूक आणि संवेदनशील असते, तेव्हा आपण आपल्या बाळासाठी निवडत असलेली उत्पादने सुरक्षित आहेत ना याची खात्री करून घ्यायला हवी. मग ते तेल असो, क्रीम असो किंवा शाम्पू व साबण असो. ही उत्पादने बाळाच्या त्वचेसाठी सौम्य आणि सुरक्षित असायला हवीत. बेबी केअर उत्पादनांमध्ये थॅलेट्‌स (Phatalate) आणि खनिज तेलांसारखे कठोर घटक असू शकतात आणि बाळांच्या नाजूक त्वचेला त्यांचा त्रास होऊ शकतो.
बाळांच्या त्वचेसाठी कोरफड, वाळ्याचे गवत, चणे (चण्याचं पीठ), लव्हेंडर, भारतीय कमळ अशा वनौषधींची शिफारस करतात, जी बाळाच्या त्वचेची कोमलता जपण्यास उपयुक्त आहेत. कॅलेमाइन असलेले क्रीम्स त्वचेवरील पुरळ नाहीसे करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाळांच्या त्वचेवर असे पुरळ उठण्याची शक्‍यता अधिक असते.
शुष्क त्वचेसाठी कोरफड हा सर्वोत्तम उपाय आहे आणि पुरळ तसेच खाज दूर करण्यासाठीही ती उपयुक्त आहे. तिच्यातील दाहशामक गुण बाळांच्या त्वचेच्या छोट्या-मोठ्या समस्या परिणामकारकरित्या दूर करण्यास मदत करतात. अशा वनौषधींमध्ये जंतूनाशक आणि बुरशीनाशक घटक असतात, जे त्वचेला शीतलता व नवा तजेला देतात.
या वनौषधी त्वचारोग दूर करण्यासाठी आणि त्वचेला येणारा लालसरपणा, दाह व डायपरमुळे उठणारे चट्टे कमी करण्यासाठी मदत करतात. बाळाच्या रोजच्या देखभालीमध्ये ऑलिव्ह तेलाचा समावेश केल्यास बाळाची नाजूक त्वचा कोमल, सौम्य राहते व तिचे पोषणही होते. ऑलिव्ह तेल हे अण्टिऑक्‍सिडंट गुणधर्म असलेल्या ई जीवनसत्वाने समृद्ध आहे, त्यामुळे बाळाची त्वचा निरोगी राहते.
“बाळाची त्वचा पातळ असते. केमिकल्सचा वापर असलेली उत्पादने अशा त्वचेमध्ये लगेचच शोषली जातात, जे धोकादायक ठरण्याचा संभव असतो. म्हणूनच वनौषधींची ताकद असलेली उत्पादने निवडणे अधिकच महत्त्वाचे आहे. तुमच्या बाळाचे आरोग्य तुमच्या हातात आहे. बाळाच्या त्वचेसाठी सुरक्षित उत्पादने निवडण्याबरोबरच त्यांना योग्य प्रमाणात पोषणमूल्ये पुरविणे आणि व्यायाम देणे हेही त्यांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी आवश्‍यक आहे. आपल्या लहानग्यांना समतोल, पोषक आहार द्या आणि मोकळ्या जागी जाऊन खेळण्याला त्यांच्या दिनक्रमाचा भाग बनवा.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)