धन आणि मनगटशक्तीचा आघाडीकडून वापर : येडियुरप्पा 

बंगळूर – कॉंग्रेस-जेडीएस आघाडीने धनशक्ती आणि मनगटशक्तीचा वापर करून कर्नाटकमधील पोटनिवडणूक जिंकल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी केला. पोटनिवडणुकीत मद्यानेही मोठी भूमिका निभावली. कारस्थाने रचण्यात कॉंग्रेस आणि जेडीएस हे पक्ष तज्ञ असल्याचे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवूून दिले. पराभवामुळे आम्ही स्वस्थ बसणार नाही.

आम्ही केवळ बल्लारी लोकसभा मतदारसंघ गमावला. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजप आत्मपरीक्षण करेल, असे म्हणत पुढील लोकसभा निवडणुकीत भाजप कर्नाटकमधील 28 पैकी 22 ते 23 जागा जिंकेल, असा विश्‍वासही येडियुरप्पा यांनी बोलून दाखवला. यावेळी त्यांनी राज्यव्यापी दौऱ्याचा संकल्पही जाहीर केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)