दहशतवादी हल्ल्यांबाबत अमेरिकेचे भारताला सावधगिरीचे इशारे

वॉशिंग्टन (अमेरिका) : दहशतवादी हल्ल्यांबाबत अमेरिकेने भारताला सावधगिरीचे इशारे दिले आहेत. भारतात होणाऱ्या निवडणुकीपूर्वी दहशतवादी हल्ले आणि दंग्यांबाबत अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने भारताला धोक्‍याची सूचना दिली आहे. दहशतवादाबाबत पाकिस्तानचा दृष्टिकोन संकुचित असून पाकिस्तान दहशतवादाचा वापर धोरणात्मक शस्त्र म्हणून करत असल्याचे अमेरिकन गुप्तचर विभागाचे संचालक डॅन कोट्‌स यांनी सांगितले. पाकिस्तानचे समर्थन असलेले दहशतवादी गट भारत आणि अमेरिकेत हल्ले करत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

पाकिस्तानाला स्वत:ला धोकादायक होऊ शकणाऱ्या दहशतवादी गटांवरच पाकिस्तान कारवाई करत असल्याचे आणि दहशतवादाचा पाकिस्तान धोरणात्मक हत्यार म्हणून वापर करत असल्याचे त्यांनी उघड केले आहे. आणि त्यामुळेच तालिबानविरुद्धच्या लढाईत अमेरिकेला अपेक्षित यश मिळत नाही, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग द्वारा दोन देशांतील संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण त्यांच्यातील तणाव कायम राहणार आहे. कारण चीन आपले आर्थिक, राजनैतिक आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न चालूच ठेवणार आहे.

भाजपाच्या शासनकालात भाजपाची सत्ता असलेल्या काही राज्यात सांप्रदायिक तणाव वाढले असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. जर भाजपाने हिंदुत्वाचे धोरण घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला तर काही ठिकाणी सांप्रदायिक तणाव वाढण्याची शक्‍यता त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)