पाकिस्तानात होणारी अमेरिका-तालिबान चर्चा स्थगित

इस्लामाबाद – अमेरिका आणि तालिबान यांच्यात पाकिस्तानात होणारी चर्चा स्थगित झाली आहे. ही चर्चा सोमवारी होणार होती पण ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. त्या विषयीची माहिती देताना सांगण्यात आले की अमेरिका आणि संयुक्तराष्ट्रांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे तालिबानचे प्रतिनिधी पाकिस्तानात प्रवास करू शकले नाहीत त्यामुळे ही चर्चा पुढे ढकलण्यात आली आहे. तालिबानचा प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद याने सोमवार पासून आम्ही व अमेरिकेत इस्लामाबादेत चर्चा होईल असे म्हटले होते. आम्ही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही चर्चा करणार आहोत असे तालिबानच्या प्रवक्‍त्याने म्हटले होते.

दरम्यान काही अधिकृत सूत्रांनी म्हटले आहे की तालिबानच्या काही नेत्यांवर निर्बंध जारी आहेत हे खरे असले तरी चर्चा स्थगित होण्याचे ते एकमेव कारण नाही. या चर्चेविषयी अफगाणिस्तान सरकार फारसे समाधानी नाही हे एक कारण आणि दुसरे म्हणजे याच दरम्यान सौदीचे प्रिंस सलमान हे पाकिस्तान दौऱ्यावर येणार होते ते दुसरे महत्वाचे कारण या मागे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आता तालिबानी प्रतिनीधी आणि अमेरिकन प्रतिनिधी यांच्यातील चर्चेची नंतरची फेरी 25 फेब्रुवारी रोजी दोहा येथे होणार आहे. सतरा वर्षाच्या संघर्षानंतर तालिबानी संघटनेचे प्रतिनिधी प्रथमच चर्चेच्या टेबलावर आले आहेत. अद्याप ही चर्चा अगदीच प्राथमिक स्वरूपात असली तरी पुढील काळात अफगाणीस्तानच्या भूमीत शांतता प्रस्थापित करण्याचा निर्णय या चर्चेच्या प्रक्रियेतून होईल अशी अमेरिकेला आशा आहे. दरम्यान तालिबान आणि अमेरिका यांच्यातील शांततेची चर्चा पाकिस्तानात घेण्याला अफगाणिस्तानने जोरदार विरोध दर्शवला होता त्यामुळेच ही चर्चा होऊ शकली नाही असे सांगण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)