अमेरिका संशयित इसिस दहशतवादी देत आहे इराकच्या ताब्यात 

file photo

बैरुत – अमेरिका संशयित इसिस दहशतवादी इराकच्या ताब्यात देत असल्याची माहितीए एचआरडब्ल्यू (ह्यूमन राईट्‌स वॉच) ने दिली आहे. एचआरडब्ल्यूच्या निरीक्षणाखाली सीरियामधील इसिसचे दहशतवादी इराकच्या ताब्यात देण्याचे अमेरिकेने मान्य केले आहे.

अमेरिकेकडून सीरियात पकडण्यात आलेल्या या इसिसच्या दहशतवाद्यांचा छळ केला जात होता आणि त्यांच्यावरील खटले चालवण्यात दिरंगाई केली जात होती असा आरोप केला जात आहे. इस्लामिक स्टेटच्या अनेक संशयित दहशतवाद्यांना अमेरिकेने खटले चालवण्यासाठी इराकची राजधानी बगदाद येथे पाठवले आहे, असे एचाआरडब्ल्यू या न्यूयॉर्कमधील संस्थेने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जर त्यांना इराकला पाठवले नाही, तर त्यांचा छळ होईल वा त्यांच्यावरील खटले अयोग्य प्रकारे चालवले जातील असे एचआरडब्ल्यूचे नदीम हावरी यांनी म्हटले आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि लॅबेनॉनसह अनेक देशांतीक आरोपींची सुनावणी अलीकडच्या काळात बगदादमध्ये झालेली आहे. हे सर्व आरोपी सीरियामध्येच पकडले गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)