तालिबानबरोबरच्या चर्चेसाठी अमेरिकेचे विशेष दूत दोहा येथे दाखल

दोहा – अफगाणिस्तानातील तालिबानच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे विशेष दुत जाल्मे खलिजाझ दोहा येथे दाखल झाले आहेत. गेल्या 17 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपविण्याच्या दृष्टीने तालिबान आणि अमेरिकेदरम्यान गेल्या महिन्याभरात चर्चेची ही सहावी फेरी असून या चर्चेतून काही सकारात्मक मार्ग निघेल अशी आशा असल्याचे खलिजाझ म्हणाले. गेल्या महिन्यात झालेल्या चर्चेनंतर सामोपचारासाठी दोन्ही बाजूने मसुदा तयार करण्यात आलेला असून त्याद्वारे तालिबान आता अफगाणिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी न घालता दहशतवाद रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नमूद केले आहे.

तालिबानचा उपनेता मुल्लाह अब्दुल घनी बरदर हा देखील या चर्चेसाठी दाखल झाला असल्याचे तालिबानच्या सुत्रांनी सांगितले असून बरदर याने यावेळी चर्चेदरम्यान कोणते मुद्दे मांडले या विषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. तालिबानही या शांतता प्रस्तावाबाबत गंभीर आहे, असे अफगाणिस्तान सरकारचे विशेष दूत मोहम्मद ओमर दाऊदझई यांनी सांगितले. गरज पडल्यास आपण कठीण निर्णय घेऊ शकतो. आगामी काळात या शांतता प्रस्तावाबाबत काही निर्णय घेतला जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बरदरला 2010 साली अटक करण्यात आली होती. मात्र ऑक्‍टोबर 2018 साली त्याची मुक्तता करण्यात आली होती. बरदर हा मुल्ला ओमरच्या नंतरचा तालिबानमधील दुसऱ्या क्रमांकाचा नेता असून 2013 साली मुल्ला ओमरच्या हत्येनंतर त्याला तालिबानचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्यावेळी तालिबानने अफगाणिस्तान सरकार सोबत चर्चा करण्यास नकार दिला होता. अफगाण सरकार हे केवळ अमेरिकेच्या हातचे बाहुले असल्याची टीका त्यांनी केली होती.

मात्र, तालिबान अजूनही अफगाण सरकारशी बोलण्यास तयार नाहीत, पण आम्ही तयार आहोत. आम्हाला वाटते की तालिबानचा अप्रामाणिकपणा हाच या चर्चेमधील एकमेव अडथळा आहे. मात्र तरिही आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास कधीही तयार आहोत, असे अफगाणिस्तानचे पंतप्रधान अब्दुल्ला अब्दुल्ला म्हणाले. तालिबानी हिंसाचारात मोठ्या प्रमाणात निष्पाप नागरिकांचा बळी गेला असून आता हे थांबायला हवे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)