अमेरिकेने पाकिस्तानला 1 डॉलरचीही मदत देऊ नये : निक्‍की हॅले 

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने पाकिस्तानला एका डॉलरचीही मदत करू नये असे अमेरिकेच्या राष्ट्रसंघातील राजदूत निक्की हॅले यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा पाकिस्तानचा इतिहास फार जुना आहे, त्यामुळे जोपर्यंत पाकिस्तान आपली वृत्ती बदलत नाही, तोपर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला मदत करू नये असे मत व्यक्त करताना पाकिस्तानला देण्यात येणाऱ्या मदतीवर निर्बंध घातल्याबद्दल निक्की हॅले यांनी ट्रम्प प्रशासनाची प्रशंसा केली आहे.

अमेरिकेने एखाद्या देशाला उदारपणे मदत केल्यानंतर त्याच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा करणे वाजवी आहे, परंतु पाकिस्तानने नेहमीच अनेक मुद्‌द्‌यांवर राष्ट्रसंघात अमेरिकेला विरोध केला आहे, याचा त्यांनी उल्लेख केला. सन 2017 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानला 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत केली. त्यापैकी बरीच पाकिस्तानी लष्कराकडे गेली. काही मार्ग-महामार्ग आणि ऊर्जा प्रकल्पांद्वारे जनतेपर्यंत गेली. राष्ट्रसंघातील महत्त्वाच्या मुद्‌द्‌यांवर पाकिस्तानने अमेरिकेच्या विरोधात मत देण्याचे प्रमाण 76 टक्के असल्याचा निक्की हॅले यांनी उल्लेख केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा पाकिस्तानचा इतिहासही जुनाच असल्याचे सांगून निक्की हॅले म्हणाल्या, की पाकिस्तानला करण्यात येणाऱ्या मदतीवर निर्बंध घालण्याचा सुज्ञ निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला असला, तरी त्या बाबतीत आणखी बरेच काही करता येण्यासारखे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)