पेट्रोल अठरा दिवसांत 4 रूपयांनी स्वस्त

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वी मोठा भडका उडालेल्या इंधनांच्या दरांनी ऐन सणासुदीत जनसामान्यांना चांगलाच दिलासा दिला आहे. मागील अठरा दिवसांत पेट्रोल 4.05 रूपयांनी तर डिझेल 2.33 रूपयांनी स्वस्त झाले आहे.
ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचे सत्र सुरू झाले. त्यामुळे दोन्ही इंधनांच्या दरांनी उच्चांकी पातळी गाठली.

दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलचा दर 4 ऑक्‍टोबर या दिवशी अनुक्रमे 84 रूपये आणि 91.34 रूपये इतका झाला. त्यादिवशी डिझेलचा दर दिल्ली आणि मुंबईत अनुक्रमे 75.45 रूपये आणि 80.10 रूपये नोंदला गेला. त्यामुळे त्यादिवशी केंद्र सरकारने जनसामान्यांना दिलासा देण्याच्या उद्देशातून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रत्येकी 1.50 रूपयाने कमी करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, सार्वजनिक कंपन्यांना त्या इंधनांवर लिटरमागे प्रत्येकी 1 रूपया अनुदान देण्याची सूचना सरकारने केली. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर तात्पुरते खाली आले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर चढेच राहिल्याने 17 ऑक्‍टोबरला दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 82.33 रूपये आणि 75.69 रूपये इतके झाले.

त्यादिवशी मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 88.29 रूपये आणि 79.37 रूपये इतके नोंदले गेले. मात्र, त्यानंतर आंतराष्ट्रीय बाजारातील कच्च्या इंधनांचे दर खाली आल्याने आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाचे मूल्य वधारल्याने पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याचे सत्र सुरू झाले आहे. रविवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 78.78 रूपये तर डिझेलचा दर 73.36 रूपये इतका होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)