अमेरिकेच्या निर्बंधांचा कोणताही परिणाम होणार नाही- खामेनी 

तेहरान – अमेरिकेने इराणकडून तेल आयात करणाऱ्या देशांना निर्बंधांमधून यापुढे सवलत न देण्याचा घेतलेला निर्णय हा अन्य देशांना ओलिस धरण्याचा प्रकार आहे. मात्र ही सवलत काढून घेतल्याने काहीही फरक पडणार नाही, असे इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्लाह अली खामेनी यांनी म्हटले आहे.

इराणच्या तेलविक्रीवर बहिष्कार घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. मात्र त्यामुळे काहीही निष्पन्न होणार नाही. आम्हाला आवश्‍यकता आहे तेवढ्या तेलाची इराणकडून निर्यात केली जाईल, असे खामेनी यांच्या अधिकाऱ्याने इंग्रजीमधील ट्‌विटमध्ये म्हटले आहे. या ट्‌विटमध्ये खामेनी यांच्या भाषणातील काही महत्वाचे अंश नमूद करण्यात आले आहेत. अमेरिकेने सोमवारी भारत, चीन, तुर्की, जपान आणि दक्षिण कोरिया या पाच देशांना इराणकडून तेल खरेदी न करण्याबाबत इशारा दिला आहे. जर या देशांनी इराणकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही, तर त्यांच्यावर निर्बंध लादावे लागेल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2015 मध्ये इराणबरोबरच्या अणू करारामधून माघार घेतली आणि इराणच्या आण्विक कार्यक्रमांमवर नियंत्रण आणण्यासाठी आर्थिक निर्बंधही घातले. त्यानंतर इराणकडून तेल खरेदी करू नये म्हणून 8 देशांवर निर्बंध घातले. सहा महिन्यांनंतर त्यातील ग्रीस, इटली, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांनी तेल खरेदी कमी केल्यामुळे या निर्बंधांमधून सवलत देण्यात आली होती. आता ही सवलत 3 पासून पूर्णपणे थांबवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)