उत्तर कोरियाला अमेरिकन न्यायालयाचा 50 कोटी डॉलर्स दंड

वॉशिंग्टन (अमेरिका): उत्तर कोरियाला अमेरिकेतील एका संघीय न्यायालयाने 50 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. वॉर्मबीयरच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या एका खटल्याचा निकाल जाहीर करताना हा दंड ठोठावण्यात आलेला आहे. ओटो वॉर्मबीयर याच्या मृत्यूबाबत न्यायालयाने उत्तर कोरियन सरकारला जबाबदार धरले आणि त्यासाठी हा दंड ठोठावला आहे. ओटो वार्मबीयर याच्यावर उत्तर कोरियात अत्याचार झाले, या वॉर्मबीयर कुटुंबीयांच्या आरोपाशी न्यायमूर्ती बेरील होवेल यांनी सहमती दर्शवली आहे. आणि त्याच्या मृत्यूला उत्तर कोरिआ सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

व्हर्जिनियायातील एका पर्यटन गटाबरोबर ओटो वार्मबीयर उत्तर कोरियाला गेला होता. तेथे प्रसार प्रचाराचे एक पोस्टर चोरल्याचा त्याच्यावर आरोप ठेवत अटक करून त्याचा छळ करण्यात आला आणि त्या छळानेच त्याचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. जून 2017 मध्ये ओटो वॉर्मबीयर अमेरिकेत परतला तेव्हा कोमात होता. त्याचा छळ झाल्याच्या खूण दिसत होत्या. अमेरिकेबरोबरच्या वादात त्याचा एका प्याद्याप्रमाणे वापर करण्यात आला, असे न्यायालयाने म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)