नववर्ष संध्येच्या बॉंब ट्विटबद्दल अमेरिकन लष्कराचा माफीनामा

न्युयॉर्क: अमेरिकन स्ट्रॅटिजिक कमांड “स्टारकॉम’ने नवीन वर्षाच्या संध्येला केलेल्या ट्विटबद्दल जाहीर माफी मागितली आहे. पारंपरिक टाईम्स स्क्वेयर क्रिस्टल बॉल समारंभाच्या वेळी या क्रिस्टल बॉलपेक्षा अधिक महत्त्वाचे, किती तरी मोठे टाकण्यास आपण सज्ज असल्याचे ट्विट स्टारकॉमने केले होते.

स्टारकॉमचे या संदर्भात जारी केलेल्या व्हिडियोमध्ये दोन बी-2 बॉंबफेकी विमाने बॉंब टाकताना दाखवली होती. आणि खाली संदेश दिला होता, की गरज पडली तर आम्ही यापेक्षाही मोठे, खूप मोठे काही टाकण्यास सज्ज आहोत. मात्र या ट्विटवर लोकांनी नाराजी व्यक्त करत प्रचंड प्रमाणावर टीका केली होती. त्यानंतर स्टॉरकॉमने संबधित ट्‌विट काढून टाकले. व्हिडियोत दाखवलेले बॉंब हे परमाणूरहित बॉंब होते असे स्पष्टीकरण केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सदर ट्विट हिणकस अभिरुचीचे असून आमच्या धोरणांशी विसंगत आहे, सबब आम्ही ते काढून टाकले आहे. असे स्पष्ट करून स्टारकॉमने जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे. आणि अमेरिकन आणि दोस्तांचे संरक्षण करणे हे आमचे ध्येय असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

1907 सालापासून टाईम्स स्क्वेयरमध्ये भला मोठा क्रिस्टल बॉल हळू हळू खाली येताना पाहण्यासाठी, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि आनंदाची उधळण करण्यासाठी लोक प्रचंड संख्येने जमा होत असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)