भारतासह 8 देशांना इराणकडून तेल आयातीस अमेरिकेची मंजुरी 

वॉशिंग्टन – भारतासह 9 देशांना इराणकडून तेल आयात करण्याची मंजुरी देण्यास अमेरिका तयार असल्याची माहिती ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. या आठ देशांमध्ये भारताबरोबरच जपान आणि दक्षिण कोरियाचा समावेश आहे. मात्र अन्य पाच देशांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. या आठ देशांना देण्यात आलेली इराणकडून तेल खरेदीची सवलत तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे ट्रम्प प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे.

इराणची अर्थव्यस्था धीमी करणे हा निर्बंधामागचा अमेरिकेचा उद्देश होता, मात्र त्यामुळे तेलाच्या किमतीत वाढ अमेरिकेला मान्य नाही. या बाबतीत अमेरिकेचे परराष्टृमंत्री माईक पॉम्पिओ निवेदन करणार आहेत. चीन इराणकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा ग्राहक आहे. इराणकडून तेल आयात करण्याची सवलत मिळावी यासाठी चीनची अमेरिकेबरोबर चर्चा चालू आहे.

तेल निर्यातीतून इराणला अधिक महसूल मिळू नये याची खबरदारी ट्रम्प प्रशासन घेणार आहे. तेल आयातीची सवलत अनेक देशांना मिळणार असण्याच्या अपेक्षेने आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमती कमी होऊन 85 डॉलर्स प्रति बॅरल झाल्या होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)