अमेरिका आणि इस्रायल युनेस्कोमधून बाहेर-पक्षपाताचा केला आरोप

पॅरिस (फ्रान्स): अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देश अधिकृतपणे युनेस्को (युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँण्ड कल्चरल ऑर्गनायझेशन) मधून बाहेर पडले आहेत. अमेरिका आणि इस्रायल बाहेर पडणे हा युनेस्कोला मोठा धक्का आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी अमेरिकेच्या सहकार्याने युनेस्कोची स्थापना करण्यात आली होती. इस्रायलबाबत होत असलेला पक्षपात हे युनेस्को सोडण्याचे कारण असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

ऑक्‍टोबर 2017 मध्येच युनेस्को सोडणार असल्याबाबत ट्रम्प यांनी युनेस्कोला नोटीस दिली होती. आणि इस्रायल बाहेर पडल्याने युनेस्कोचे मोठे आर्थिक नुकसान मात्र होणार नाही. कारण या दोन्ही देशांनी युनेस्कोला आर्थिक मदत देणे बंद केले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

2011मध्ये युनेस्कोने पॅलेस्टाईनला स्थायी सदस्यत्व देऊन ज्यूंच्या धरतीवर त्यांच्या हक्काची पुष्टी केली होती. या गोष्टीबाबत अमेरिका आणि इस्रायलने नाराजी जाहीर केली होती. अमेरिकेने यापूर्वी 1984 साली युनेस्को सोडली होती, ती 1994 सालापर्यंत. त्यानंतर अमेरिकेने युनेस्कोमध्ये पुन:प्रवेश घेतला. अमेरिका युनेस्कोमधून बाहेर पडली असली, तरी पर्यवेक्षक म्हणून युनेस्कोत काम करण्याची इच्छा अमेरिकेने व्यक्‍त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)